न्यूयॉर्क - भारताचीटेनिस स्टार
सानिया मिर्झाने
आपले तिजयी अभियान कायम ठेवताना अमेरिकन ओपनच्या महिला दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सानियाने आपली जोडीदार कारा ब्लॅकसोबत ही कामगिरी केली.
सानिया आणि तिची झिम्बाब्वेची जोडीदार कारा ब्लॅक यांनी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कजाकिस्तानची जरिना डियास आणि चीनची यी फॉन जू या जोडीला हरवले. डियास-जू जोडी निवृत्त झाल्याने सानिया-ब्लॅकला सहजपणे अंतिम चारमध्ये प्रवेश मिळाला.
सानिया-ब्लॅक यांनी पहिल्या सेटमध्ये आक्रमक सुरुवात करताना अवघ्या 40 मिनिटांत 6-1 ने आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये जरिना डियास आणि यी फॉन जू या जोडीने स्पर्धेतून माघार घेतली.
पुढील स्लाइडवर पाहा, सानिया मिर्झाचा युएस मधील जलवा