आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झाला नंबर वनची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॅडमिंटन स्टार सायना नेहवालप्रमाणे टेनिस स्टार सानिया मिर्झा जगात नंबर वन खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही खेळाडू हैदराबादच्या आहेत. सध्या डब्ल्यूटीएच्या क्रमवारीत सानिया तिसर्‍या क्रमांकावर आहे. सानिया-हिंगीस जोडीला मियामी किताबने १००० गुण मिळाले आहेत.

सानिया आणि अव्वल क्रमांकावर असलेल्या इटलीची सारा इराणी तसेच रॉबर्टा विंसी यांच्यात गुणांचे अंतर आता फार कमी राहिले आहे. सारा आणि रॉबर्टा यांचे एकसारखे ७६४० गुण असून, सानियाच्या नावे ७४९५ गुण आहेत. सानिया आणि अव्वल क्रमांकाच्या खेळाडूंत आता फक्त १४५ गुणांचे अंतर शिल्लक आहे. हे अंतर पुढच्या कोणत्याही स्पर्धेत सहजपणे कमी होऊ शकते.

बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल नुकतीच जगातली नंबर वन खेळाडू बनली होती. मात्र, मलेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्याने तिचे नंबर वनचे सिंहासनही हातून गेले. मात्र, पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या सिंगापूर ओपनमध्ये ती पुन्हा नंबर वन बनू शकते.

सानिया मिर्झा डब्ल्यूटीएमध्ये नंबर वनचे स्थान मिळवण्याच्या आपल्या स्वप्नाच्या जवळ पोहोचली आहे. तिची जोडीदार मार्टिना हिंगीसच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती झाली. ती चौथ्या क्रमांकावर आहे.

पेस, बोपन्नाची प्रगती
दरम्यान, पुरुषांच्या दुहेरीच्या क्रमवारीत लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांनी प्रत्येकी दोन स्थानांनी सुधारणा केली. पेस आता २३ व्या तर बोपन्ना २४ व्या क्रमांकावर आहे. एकेरीच्या क्रमवारीत सोमदेव देववर्मनने १७१ वे स्थान गाठले.
बातम्या आणखी आहेत...