आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Marriage Anniversary Spcl Shoaib Dances In Ipl Tunes

MARRIAGE ANNIVERSARY: सानियाच्‍या शोएबचे \'दिल\' झाले \'जंपिंग-जपांग\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय टेनिस स्‍टार सानिया मिर्झाने शुक्रवारी आपल्‍या लग्‍नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. पण नेमकं याचवेळी ती आपला पती शोएबबरोबर नव्‍हती. मात्र, पतीराजांनी टीव्‍हीवर लाईव्‍ह कार्यक्रमात आपल्‍या लग्‍नाचा वाढदिवस साजरा करून सर्वांचे मने जिंकली.

शोएब पाकिस्‍तानच्‍या जिओ टीव्‍हीवरील एका शोमध्‍ये उपस्थित होता. तिथे त्‍याने आयपीएलचे थीम सॉंग, 'दिल जंपिंग जपांग' वर डान्‍स करून आपला आनंद साजरा केला.

सानिया सध्‍या हैदराबादमध्‍ये आहे. आणि शोएब मायदेशातील क्रिकेटमध्‍ये व्‍यस्‍त आहे. सानिया आणि शोएबने सर्वांना धक्‍का देत 2010 मध्‍ये लग्‍न केले होते. पाकिस्‍तान आणि भारताच्‍या या लव्‍ह कपलच्‍या लग्‍नामुळे मोठी खळबळ उडाली होती. इंडियन टेनिस स्‍टार खेळाडू सानियाने आपल्‍या पुरूष फॅन्‍सला धक्‍का देत पाकिस्‍तानी क्रिकेटपटूशी लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला होता.

अनेक अडचणी आणि कायदेशीर लढाई केल्‍यानंतर सानिया आणि शोएबचा विवाह 12 एप्रिल 2010 मध्‍ये हैदराबाद येथे झाला. www.divyamarathi.comने सानिया मिर्झाच्‍या लग्‍नाच्‍या तिस-या वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा देण्‍यासाठी या जोडीचे काही खास फोटो वाचकांना उपलब्‍ध करून देत आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून तुम्‍हीही सामील व्‍हा सानियाच्‍या लग्‍नाच्‍या वाढदिवसात...