आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sania Mirza News In Marathi, Divya Marathi, Tokyo

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅसिफिक ओपन : सानिया फायनलमध्ये प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जबरदस्त फॉर्मात असलेली सानिया मिर्झा डब्ल्यूटीए टोरी पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदापासून अवघ्या एका पावलावर आहे. तिला पुन्हा एकदा या स्पर्धेत महिला दुहेरीच्या किताबावर नाव कोरण्याची संधी आहे.

भारताची टेनिस स्टार सानियाने शुक्रवारी आपली सहकारी झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या अव्वल मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत जेलेना यांकोविक आणि अराटक्सा पारा सांतोजोचा पराभव केला. सानिया-काराने ६-३, ६-२ ने उपांत्य सामना जिंकून स्पर्धेतील विजयी मोहीम अबाधित ठेवली. या जोडीने ६३ मिनिटांत फायनलमधील स्थान निश्चित केले.