आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्वल स्थानामुळे कुटुंबाचे आणि देशाचे स्वप्नही सत्यात उतरले : सानिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्ल्सटन - दुहेरी टेनिसमध्ये अव्वल क्रमांकावर विराजमान झाल्यामुळे स्वप्न सत्यात उतरले, अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झाने दिली. ती म्हणाली, खेळात नंबर वन बनणे हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते. माझे हे स्वप्न साकार झाले. असे घडणे म्हणजे माझ्या कुटुंबाचे आणि देशाचे स्वप्न सत्यात उतरल्यासारखेच आहे.

सानियाने रविवारी मार्टिना हिंगीसच्या साथीने फॅमिली सर्कल चषक जिंकला. या विजयानंतर सानियाला ४७० गुण मिळाले. स्पर्धेआधी ती क्रमवारीत तिसऱ्या स्थानी होती. आता ७६६० गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. सानियानंतर इटलीची सारा इराणी (७६४०) दुसऱ्या आणि रॉबर्टा विन्सी (७६४०) तिसऱ्या व मार्टिना हिंगीस ६४६५ गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

एआयटीए करणार सन्मान
नवी दिल्ली | नंबर वन बनल्याबद्दल अखिल भारतीय टेनिस संघ (एआयटीए) सानियाचा सन्मान करणार आहे. स्पर्धा निर्देशक अशोक कुमार यांनी सांिगतले की, फेड आशिया ओसनिया जॉन ग्रुप दोन स्पर्धेदरम्यान सानियाचा गौरव करणार आहे.