Home »Sports »Expert Comment» Sania Mirza Promotes One Plus 3T Phone, Using An IPhone

सानिया मिर्झाची पकडली गेली चूक, सोशल मीडियात फॅन्सनी अशी घेतली फिरकी

दिव्यमराठी वेब टीम | May 23, 2017, 11:37 AM IST

  • सानियाने मोबाईल फोन कंपनी 'वन प्लस 3 टी' ला प्रमोट करताना आपल्या आयफोनद्वारे टि्वट केले. ज्यानंतर हे टि्वट व्हायरल झाले व फॅन्सनी तिची फिरकी घ्यायला सुरुवात झाली.
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने नुकतेच एका मोबाईल कंपनीला प्रमोट करण्यासाठी एक ट्विट केले, जे तिच्यासाठीच मोठे संकट बनले. खरं तर सानियाने मोबाईल कंपनी 'वन प्लस 3T' चे एक मॉडेल प्रमोट करण्यासाठी हे ट्विट केले होते. ज्यात तिने म्हटले की, मी हा फोन यूज करत आहे तसेच तो खूपच छान आहे. मात्र, हे ट्विट करता तिने एक चूक अशी केली की, हे टि्वट तिने आपल्या आयफोनवरून केले. ज्यानंतर तिची चूक व खोटारडेपणा ट्विटर यूजर्सनी पकडला आणि तिची फिरकी घ्यायला सुरुवात केली. मात्र, जेव्हा सानियाला याची खबर लागली तेव्हा चूक लक्षात आली. तिने ताबडतोब ते टि्वट डिलीट करून टाकले. मात्र तोपर्यंत ते टि्वट व्हायरल झाले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्विटर यूजर्सनी कशा पद्धतीने सानियाची घेतली फिरकी....

Next Article

Recommended