आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Reach Career Best Doubles Tennis Ranking News In Marathi

सानिया मिर्झा जागतिक क्रमवारीत प्रथमच टॉप 5 मध्‍ये, इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केले छायाचित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - विम्‍बल्‍डन टेनिस स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर सानिया मिर्झाने WTA दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पाचव्‍यास्थानी मजल मारली. आतापर्यंतच्‍या करिअरमधील तिचे हे सर्वोत्‍तम रॅकिंग आहे.
2003 मध्‍ये व्‍यावसायिक टेनिस खेळणा-या सानियाने झिम्बाब्वेची आपली सहकारी कारा ब्लॅकसोबत विम्‍बल्‍डनच्‍या दुस-या फेरीपर्यंत मजल मारली होती. ती 130 पॉइंटनुसार ती पाचव्‍या स्‍थानी पोहोचली आहे. नुकतीच टेनिसची क्रमवारी जाहीर करण्यात आली.

''मनगटाला झालेल्‍या दुखापतीतून सावरण्‍यासाठी मला खूप सावरावे लागले. तीन सर्जरीनंतर मेहनतीच्‍या जोरावर मला हे स्‍थान मिळाले आहे. टॉप 5 मध्‍ये सहभागी झाल्‍याने मी खूप आनंदी आहे'', अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झाने दिली आहे.
(फाइलफोटो- सानिया मिर्झा)

पुढील स्‍लाइडवर वाचा, सोमदेवची रँकिंग ढासळली.