आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza S Best Partner Bethanie Mattek Sands In Tennis

PHOTOS: सानिया मिर्झाच्‍या यशामागे आहे या \'लेडी गागा\'चा दम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंच ओपन टुर्नामेंटमध्‍ये सानिया मिर्झाने दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. बेथानी माटेक-सँड्स बरोबर जोडी जमवलेल्‍या सानियाने फ्रान्‍सच्‍याच एलीज कॉर्नेट आणि वर्जीनी रजानो जोडीला सरळ सेट्समध्‍ये पराभूत केले.

सानिया-बेथानी जोडीने कॉर्नेट आणि वर्जीनी रजानो जोडीचा एक तास 28 मिनिटे चाललेल्‍या या सामन्‍यात 6-3,6-4 असा पराभव केला. सानियाची जोडीदार बेथानीचा दम फ्रेंच ओपनच्‍या लाल मातीवर काही दिवसांपूर्वीच दिसला होता. तिने चीनची माजी चॅम्पियन की लीनाला एकेरीत हरवले होते.

अमेरिकन टेनिस स्‍टार बेथानीला टेनिसमधील 'लेडी गागा' असेही म्‍हटले जाते. तिला ही उपाधी तिच्‍या ड्रेसिंग स्‍टाईल आणि टॅटूच्‍या छंदामुळे मिळाली आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सानियाच्‍या 'लेडी गागा'चा दम...