आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाणखी ग्रँडस्लॅम जिंकायचेय, सध्या निवृत्तीचा विचार नाही, सानियाची स्पष्टोक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - टेनिस सोडण्यापूर्वी मला आणखी काही ग्रँडस्लॅम जिंकायचे आहेत, अशी प्रतिक्रिया भारताची नंबर वन टेनिसपटू आणि महिला दुहेरीतील जगातील नंबर वन खेळाडू सानिया मिर्झाने व्यक्त केली. सध्यातरी माझा निवृत्तीचा कसलाच विचार नाही, असेही तिने म्हटले.

सानियाने दुहेरीच्या क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन पटकावले. ‘माझे टेनिसवर प्रेम आहे. या खेळात जोपर्यंत रुची आहे तोपर्यंत मी खेळत राहणार. खेळात वयाचे बंधन नसते. फेडरर अजूनही खेळू शकतो, तर मग माझ्या मते मग कोणीही खेळू शकतो. अामच्यासमोर काही मोठ्या स्पर्धा आहेत. निवृत्तीपूर्वी मला आणखी काही ग्रँडस्लॅम जिंकायचे आहेत,’असे हैदराबादची सानिया म्हणाली.

२०१० मध्ये पाकचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न करणारी आणि एकेरी सोडून फक्त दुहेरीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना सानिया म्हणाली, "२०१० मध्ये हाताला झालेल्या दुखापतीमुळे कारकीर्द संपण्याची भीती माझ्या मनात होती. मला हाताने डोक्याचे केसही नीट करता येत नव्हते इतका हात दुखावला होता. टेनिस तर त्या वेळी खूप दूर वाटत होते.

शाेएबने प्रेरित केले
लग्नाच्या सहा महिन्यांनंतर शोएबने मला पुन्हा खेळण्यास प्रेरित केले. नंतर मी विम्बल्डन खेळण्यास गेले आणि काही सामने जिंकण्यात यश आले. हा माझ्या जीवनातील सर्वात चांगला निर्णय होता. काही विजयांमुळे माझा आत्मविश्वास परतला. यानंतर एकेरी सोडून दुहेरीवर लक्ष केंद्रित करणे हा माझ्या जीवनातील दुसरा महत्त्वाचा निर्णय होता. कारण माझ्या हातावर काही शस्त्रक्रिया झाल्या होत्या. मी एकेरीत खेळले असते तर दुहेरीत कधीच नंबर वन झाले नसते, असे मला वाटते.