आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Says Marriage With Shoaib Malik Not On The Rocks

नवर्‍याशी वाद नसल्याचा सानियाचा दावा, सगळे काही \'ऑल इज वेल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने तिचा नवर्‍याशी कोणताही वाद नसल्याचे सांगत वैवाहिक जीवन संकटात सापडल्याच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसमवेतचे वैवाहिक जीवन सुखी असल्याचेही तिने नमूद केले आहे.
सानिया आणि शोएब मलिकच्या संबंधात वितुष्ट आल्याच्या बातम्या गत काही काळापासून माध्यमांमध्ये झळकत आहेत. त्याचदरम्यान सियालकोट या सासरच्या गावी सानिया पोहोचल्यानंतर तिने या सर्व अफवाच असल्याचे सांगितले. आम्ही दोघेही व्यावसायिक खेळाडू आणि दोन भिन्न देशांमधील आहोत. त्यामुळे व्यावसायिक जीवनात विविध समस्या आणि ताणतणावांचा सामना करावाच लागतो. मात्र, हे सारे माहीत असल्याने आतापर्यंत तरी सारे काही व्यवस्थित चाललेले आहे.
केवळ गाठीभेटींसाठीच आले
सध्या कोणतेही सामने नसल्याने सासरच्या नातलगांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि हवापालट करण्यासाठी म्हणून आले आहे. युरोपमध्ये स्पर्धांना प्रारंभ करण्यापूर्वी विश्रांती घेण्याचाच उद्देश आहे. सध्या मी कुटुंबासह मनसोक्त भटकंती करणे तसेच आवडत्या वस्तूंच्या खरेदीत व्यग्र आहे. सर्व काही सुरळीत असून, बाकीच्या अफवाच आहेत, असेही तिने नमूद केले.
शोएबवर चार वर्षांपूर्वीइतकेच प्रेम आजही आहे...
माझे चार वर्षांपूर्वी लग्नावेळी शोएबवर जितके प्रेम होते तेवढेच आजदेखील आहे. दोघाही व्यावसायिक खेळाडूंसाठी करिअर आणि वैवाहिक जीवन सांभाळणे जिकिरीचे असते. मात्र, आम्ही त्यात बर्‍यापैकी यशस्वी झालो आहोत. पाकिस्तानमध्ये सुरक्षेची समस्या असल्याचे बोलले जात असले तरी मला तरी माझ्या सासरी अशी कोणतीच समस्या आढळली नाही.