नवी दिल्ली- ‘पुरुषप्रधान भारतात’ दुसरी सानिया घडणे अशक्य असल्याचे वादग्रस्त विधान भारताची बहूचर्चित टेनिसस्टार सानिया मिर्झाने केले. ती संयुक्त राष्ट्र संघटनेअंतर्गत आयोजित ‘महिला हिंसाचार आणि लिंगभाव’ या विषयावर बोलत होती. महिला हिंसाचार रोखावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, असे वक्तव्य करताना तिने स्वतःचेच अप्रत्यक्ष कौतुक केल्याचे दिसून येते.
सानिया म्हणाली की, मी केवळ एक महिला असल्याने मला सर्वांत जास्त पुरुषी व्यवस्थेचा जाच सहन करावा लागला. भारतातील लैंगिक असमानतेमुळे मला करिअरमध्ये कित्येक वादांना तोंड द्यावे लागले. जर मी स्त्री नसते तर मला असा जाच झाला नसता.
सानिया बनली संयुक्त राष्ट्र महिला सद्भावना दूत
सानिया मिर्झाची संयुक्त राष्ट्र महिला सद्भावना दूतपदी नियुक्ती झाली आहे. यापदी नियुक्त होणारी सानिया दक्षिण आशियातील पहिला महिला ठरली.
क्रीडाक्षेत्रात महिलांनी करिअर करावे
सानिया म्हणाली की, क्रीडा क्षेत्रात महिलांनी करिअर करावे. पुरुषप्रधान संस्कृती बदलण्याची गरज आहे. भारतीय शासनही महिला क्रीडा धोरणाविषयी चांगले धोरण स्विकारत आहे. सध्याचे क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल महिलांना क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
शासनाच्या प्रयत्नांना यश येईल
सानिया म्हणाली की, मला आनंद होत आहे. शासन लिंग असमानतेविषयी बोलत आहे. समाजात स्त्री–पुरुष समानता असायला हवी. लैंगिक समर्थनार्थ
आपण एक व्हायला हवे. शासनाच्या प्रयत्नांना नक्कीय यश येईल अशी मला आशा वाटते.