आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Sparkles In Indian Bridal Fashion Week Mumbai

रॅम्‍पवर दिसला सानियाचा जलवा...वधूच्‍या वेषात बनली शो-स्‍टॉपर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टेनिस स्‍टार सानिया मिर्झा सध्‍या यशस्‍वी वर्षाचा आनंद घेताना दिसतेय. संपूर्ण वर्षभर टेनिस कोर्टवर घाम गाळल्‍यानंतर आता ही टेनिस परी मस्‍तीच्‍या मूडमध्‍ये आहे. डिसेंबर महिन्‍याची सुरूवात तिने फॅशन रॅम्‍पवर केली.

मुंबईमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेली ब्रायडल फॅशन वीकच्‍या तिस-या दिवशी सानिया मिर्झा शो-स्‍टॉपर राहिली. तिने आपला मित्र आणि प्रसिद्ध डिझायनर शांतनु आणि निखिलसाठी भारतीय वधूचा पोशाख घातला होता. सोनेरी रंगाचा गाऊन घालून सानियाने फॅशन विश्‍वातील दिग्‍गजांना काट्याची टक्‍कर दिली.

गेल्‍यावर्षी सानियाने निळया रंगाच्‍या पोशाखात आपल्‍या सौंदर्याची मोहिनी घातली होती. यावेळी तिने ऑफ शोल्‍डर गाऊनमध्‍ये सर्वांची मने जिंकली. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, सानियाचा रॅम्‍पवरील जलवा...