आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Sushil Kumar And Pakistani Cricketers Say Salam Sachin

पाकिस्‍तानवरून आला शोएब अख्‍तर, सानिया मिर्झाबरोबर म्‍हणाला- \'सलाम सचिन !\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या शेवटच्‍या कसोटीपूर्वी सर्वचजण त्‍याच्‍या शानदार करिअरला सलाम करीत आहेत. त्‍याला सलाम करण्‍यासाठी पाकिस्‍तानचे क्रिकेटपटूही मागे नाहीत. शोएब अख्‍तरने वाघा बॉर्डर पार करून सचिनच्‍या सन्‍मानार्थ आयोजित समारोहात सहभाग नोंदवला.

टेनिस स्‍टार सानिया मिर्झा आणि ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारही टीम इंडियाच्‍या स्‍टार खेळाडूंबरोबर या खास कार्यक्रमात नजरेस पडले. कार्यक्रमाची थीमच होती- सलाम सचिन !

सचिन तेंडुलकरच्‍या अखेरच्‍या कसोटीवरून त्‍याचे कुटुंबिय आणि कोट्यवधी चाहते भावूक झाले आहेत. तर जगभरातील दिग्‍गजांचीही हीच भावना दिसून येत आहे. सचिनचे टीममधील सहकारी, मैदानावरील विरोधी संघातील खेळाडू राहिलेले आणि कुटुंबातील सदस्‍य मुंबईच्‍या वानखेडे स्‍टेडिअममध्‍ये 14 ते 18 नोव्‍हेंबरपर्यंत सामना पाहण्‍यासाठी मैदानात उपस्थित असतील. सचिनच्‍या रिटायरमेंटवरून होत असलेल्‍या कार्यक्रमांमुळे सचिनही खूप खूश आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, या खास कार्यक्रमाची निवडक छायाचित्रे...