आग्रा – भारताची टेनिस स्टार
सानिया मिर्झा चे बुधवारी ताज महल वरील प्रेम सर्वश्रुत झाले. प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणा-या ताजमहल पाहण्यासाठी सानियाला दोन वेळा प्रयत्न करावे लागले.
सानिया मिर्झा मंगळवारी सायंकाळी आग्रा येथे पोहोचली. विमानतळावरुन हॉटेलमध्ये पोहोचताच सानिया मिर्झा तात्काळ फ्रेश होउुन ताजमहल पाहण्यासाठी गेली. परंतु तिला पोहोचायला उशिर झाल्याने तिला ताजमहलमध्ये प्रवेश मिळू शकला नाही.
परंतु सानिया निराश न होता. दुस-या दिवशी तिने ताजमहला भेट दिली. सानिया ताज महल जेयपी पॅलेस होटेल द्वारा आयोजित एका कार्यक्रमासाठी आग्रा येथे आली होती. कार्यक्रमामध्ये भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळेसुध्दा उपस्थित होती.