Home »Sports »Other Sports» Sania Mirza Win First Cup In New Year

नव्या वर्षात सानिया मिर्झाचा विजेतेपदाने प्रारंभ..!

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 00:15 AM IST

  • नव्या वर्षात सानिया मिर्झाचा विजेतेपदाने प्रारंभ..!

बिस्बेन- भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने शनिवारी डब्ल्यूटीए ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा चषक जिंकून नववर्षाचा दणकेबाज प्रारंभ केला. तिने बेथानी माटेकसोबत महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात क्वेता पेश्चेक व अ‍ॅनालेना ग्रोनफिल्डचा 4-6, 6-4, 10-7 अशा फरकाने पराभव केला. दुस-या मानांकित सानिया-बेथानीचे यंदाच्या सत्रातील हे पहिले विजेतेपद ठरले, तर सानियाचा करिअरमधील हा 15 वा डब्ल्यूटीए किताब आहे.


अंतिम लढतीच्या पहिल्या सेटमध्ये क्वेता-अ‍ॅनालेनाने 6-4 ने बाजी मारून आघाडी घेतली. दुस-या सेट 6-4 ने जिंकून सानिया-बेथानीने लढतीत बरोबरी मिळवली.


त्यानंतर तिस-या निर्णायक सेटमध्ये आक्रमक सर्व्हिस करत दुस-या मानांकित इंडो-अमेरिकन जोडीने बाजी मारली. त्यांनी हा सेट 10-7 अशा फरकाने जिंकून विजेतेपद आपल्या नावे केले.

Next Article

Recommended