आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sania Mirza Won Her First Grandslam In US Open Mixed Doubles

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सानियाला अजिंक्यपद, मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात ए. स्पियर्स-गोंजालोचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने आपला सहकारी ब्रुनो सोरेससोबत यंदाच्या सत्रातील पहिल्या ग्रॅँडस्लॅमचा किताब पटकावला. तिने शुक्रवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद आपल्यानावे केले. सानिया-ब्रुनोने अंतिम सामन्यात अबिगाईल स्पियर्स आणि सॉटिआगो गोंजालोचा पराभव केला. अव्वल मानांकित जोडीने ६-१, २-६, ११-९ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. सानिया-ब्रुनोने अवघ्या ६० मिनिटांत विजेतेपदावर नाव कोरले.

अव्वल मानांकित सानिया-ब्रुनोने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये सहजपणे बाजी मारली. या वेळी बिगरमानांकित स्पियर्स आणि गोंजालोला प्रत्युत्तराची फारशी संधीही मिळाली नाही. या विजयासह सानिया-ब्रुनोने लढतीत आघाडी मिळवली. मात्र, या जोडीला दुसऱ्या सेटमध्ये निराशाजनक खेळीचा मोठा फटका बसला. स्पियर्स आणि गोंजालोने ६-२ ने दुसरा सेट जिंकून लढतीत बरोबरी साधली. मात्र, सानिया-ब्रुनोने दमदार पुनरागमन केले. या जोडीने टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये ११-९ ने बाजी मारली. यासह या अव्वल मानांकित जोडीने अंतिम सामना जिंकला.
सानियाचे तिसरे ग्रँड स्लॅम
भारताच्या सानिया मिर्झाने टेनिस करिअरमधील आपल्या तिसऱ्या ग्रँडस्लॅमवर शुक्रवारी नाव कोरले. तिने ब्रुनोसोबत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. तिचे हे दुहेरी अजिंक्यपद ठरले. तिने २००९ मध्ये महेश भूपतीसोबत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचा किताब पटकावला हाेता. त्यानंतर तिने २०१२ मध्ये फ्रेंच ओपनमध्येही मिश्र दुहेरीचा किताब पटकावला हाेता. अाता तिने पहिल्यांदा ब्रुनोसोबत अमेरिकन ओपनचे जेतेपद जिंकले.

पुढील स्लाइडमध्ये, महिला दुहेरीत पराभव