(फाइल फोटो - (L-R)
सानिया मिर्झा, वडील इम्रान मिर्झा आणि पती शोएब मलिक)
हैदराबाद - पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हैदराबादमध्ये आल्यानंतर सास-यांच्या घरी अगत्याने जातो. चॅम्पियन्स लीगमुळे भारत दौ-यावर आहे. होबार्ट हर्रिकेंन्सविरुध्द हैदराबाद मध्ये लाहोरकडून खेळणा-या शोएब मलिकने सास-यांच्या घरी
आपल्या मित्रांसह बिर्याणीवर चांगलाच ताव मारला आहे.
शोएब गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरला आहे. फलंदाजी करताना तो केवळ आठ धावा करु शकला तर गोलंदाजीमध्ये त्याने एकाच षटकामध्ये 15 धावा दिल्या.
सोशल साइटवर फोटो केले शेअर
लाहोर लॉयन्सच्या खेळाडूंनी बिर्याणीवर ताव मारतानाची छायाचित्रे
फेसबुकवर शेअर केली आहेत. ज्यामध्ये शोएब मलिक, सानियाचे वडील इम्रान खान, लाहोरचा कर्णधार मोहम्मद हफीज आदी खेळाडू दिसतात.
सानिया गैरहजर
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा सध्या भारतात नाही. पॅन पॅसिफिक ओपन टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ती दक्षिण कोरियामध्ये आहे. कारा ब्लॅकला जोडीला घेवून दुहेरीमध्ये खेळणार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, यजमानाचे सानियाच्या राहत्या घरी कसे झाले स्वागत तसेच सानियाच्या विवाहाचे छायाचित्रे.