आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या क‍िताबापासून सानिया अवघ्‍या एका पावलावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहे. तिने शुक्रवारी रोमानियाच्या होरिया टिकाऊसोबत मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे जगातील नंबर वन राफेल नदालने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. उपांत्य लढतीतील पराभवासह रॉजर फेडररचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तसेच पुरुष एकेरीत स्विसच्या स्टॅनलिस वांवरिकानेही अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
सानिया-टिकाऊ या सहाव्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीच्या उपांत्य लढतीत बिगरमानांकित ऑस्ट्रेलियाच्या जर्मिला जी आणि मॅथ्यू एबडेनला पराभूत केले. या जोडीने 2-6, 6-3, 10-2 अशा फरकाने उपांत्य लढतीत विजय मिळवला. सानिया-होरियाने 73 मिनिटांत सामना जिंकला. या जोडीने 13 मिनिटांत तिसरा सेट जिंकला. पहिल्या सेटमधील अपयशाला सावरून या जोडीने दुस-या सेटमध्ये बाजी मारली. त्यांनी लढतीत बरोबरी साधली. यासाठी या जोडीला 32 मिनिटे झुंज द्यावी लागली. मात्र, सुरेख सर्व्हिस करून या जोडीने दुसरा सेट जिंकला. त्यापाठोपाठ या जोडीने तिस-या सेटही आपल्या नावे केला.
* 28 मिनिटांत 2-6 ने गमावला पहिला सेट
* 32 मिनिटांत 6-3 ने जिंकला दुसरा सेट
* 13 मिनिटांत 10-2 ने तिस-या सेटमध्ये विजय
० 73 मिनिटांत मिळवला विजय
० सानिया-होरिया अंतिम फेरीत
ली ना-सिबुलकोवा आज फायनल
चीनची ली ना आणि स्लोव्हाकियाची डोमिनिका सिबुलकोवा शनिवारी महिला एकेरीच्या किताबासाठी समोरासमोर असतील. चौथ्या मानांकित ली नाने कॅनडाच्या इयुगेन बुचार्डला नमवून अंतिम फेरी गाठली. कॅनडाच्या या युवा खेळाडूने उपांत्य लढतीत अ‍ॅना इव्हानोविकला नमवले होते.
रॉजर फेडररचा पराभव
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररला पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. स्पेनच्या राफेल नदालने स्विसच्या फेडररला पराभूत केले. त्याने दोन तास 14 मिनिटे रंगलेल्या लढतीत 7-6, 6-3, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला.
इराणी-विन्सीला दुहेरीचे विजेतेपद
इटलीची सारा इराणी व रॉबर्टा विन्सीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या अव्वल मानांकित जोडीने दुहेरीच्या अंतिम सामन्यात रशियाच्या एकतारीना मकारोवा व एलेना वेस्निनाला पराभूत केले. इटलीच्या जोडीने 6-4, 3-6, 7-5 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. आतापर्यंत या जोडीने रोनाल्ड गारोस, अमेरिकन ओपन आणि 2012 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये किताब पटकावला होता.