आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यास सानिया मिर्झाचा होकार , सानियामुळे पदकाचा दावा प्रबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकन ओपनमधील मिश्र दुहेरीची चॅम्पियन सानिया मिर्झाने आशियाई स्पर्धेत खेळण्यास होकार दिला. त्यामुळे भारतीय टेनिस संघाचा स्पर्धेतील पदकांचा दावा प्रबळ झाला आहे. गत स्पर्धेत भारताने टेनिस खेळ प्रकारात एकूण पाच पदके जिंकली होती. आता सानियामुळे या पदकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चार वर्षांपूर्वी ग्वांगझू आशियाई स्पर्धेत सानियाने महिला एकेरीत कांस्य आणि मिश्र दुहेरीत विष्णू वर्धनसोबत रौप्यपदकाची कमाई केली होती. मागच्या आठवड्यात तिने आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. महिलांच्या जागतिक क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता तिचे मतपरिवर्तन झाले आहे. सानियाने या स्पर्धेत खेळण्यास होकार दिला आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून आशियाई स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या वेळी तिला ९०० रँकिंग गुणांची कमाई करण्याची संधी आहे.

आशियाई स्पर्धेमुळे तिला आगामी डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यानंतर तिला टोकियो आणि बीजिंग ओपन टेनिस स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. सानियाच्या सकारात्मक निर्णयामुळे टेनिसमध्ये भारताची ताकद निश्चितपणे वाढली आहे.
02पदके सानियाने गत आशियाई स्पर्धेत जिंकली होती

05पदके भारताने टेनिसमध्ये मिळवली होती
पंतप्रधान भेटीनंतर सानियाचे मतपरिर्वतन
शुक्रवारी सानिया मिर्झाने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र दी यांची भेट घेतली. या भेटीनंतर सानियाने आशियाई स्पर्धेत खेळण्यास होकार दिला. या भेटीमुळेच तिचे मतपरिवर्तन झाले, अशी चर्चा टेनिस विश्वात आहे. मात्र अखिल भारतीय टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी या चर्चेला फेटाळले. खेळणे अन् न खेळणे हा प्रत्येकाचा खासगी निर्णय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले