आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडचा हा मुलगा करतोय टीम इंडियाची सेवा, सचिन- सौरवसोबतही खेळलाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन- सौरवसोबत खेळलेला संजय बांगर सध्या टीम इंडियाचा बॅटिंग कोच आहे. - Divya Marathi
सचिन- सौरवसोबत खेळलेला संजय बांगर सध्या टीम इंडियाचा बॅटिंग कोच आहे.
स्पोर्ट्स डेस्क- बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने नुकतेच रवी शास्त्रींची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मात्र, परदेशी दौ-यांसाठी बॅटिंग कोच निवडलेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीवरून सध्या वाद सुरु आहे. मागील चार वर्षापासून संजय बांगर टीम इंडियाला बॅटिंग कोच म्हणून सेवा देत आहे. बांगर भारताचा माजी क्रिकेटर आहे. बांगरचे कसोटी करियर एक वर्ष तर वन डे करियर दोन वर्षे चालले. सचिन-सौरवसोबत खेळलाय बांगर...
 
- संजय बांगरने आपल्या कसोटी करियरमध्ये 12 मॅच आणि वनडे करियरमध्ये एकून 15 मॅच खेळल्या. टीममध्ये तो बॅटिंग ऑलराउंडर म्हणून होता. 
- बांगरने कसोटी करियरमध्ये 470 धावा आणि वनडे करियरमध्ये 180 धावा केल्या. तर दोन्ही फॉर्मेटमध्ये त्याने 7-7 विकेट घेतल्या. 
- त्याने आपला टेस्ट डेब्यू वर्ष 2001 मध्ये इंग्लंडविरूद्ध केला होता तर, वनडे डेब्यू वर्ष 2002 मध्ये इंग्लंडविरूद्ध केला होता. 
- संजय बांगर आपल्या छोट्या इंटरनॅशनल करियरमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळेंसारख्या यशस्वी क्रिकेटर्ससोबत क्रिकेट खेळला. 
- बांगर 2003 वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहचलेल्या टीम इंडियाच्या संघात होता. मात्र, त्याला संपूर्ण टूर्नामेंटमध्ये एक सुद्धा मॅच खेळायला मिळाली नव्हती. 
- जानेवारी 2013 मध्ये त्याने क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. तो करियरमध्ये सुमारे 20 वर्षे क्रिकेट खेळला. 
 
शेजारच्या घरी पाहिली फायनल-
 
- एका इंटरव्यू दरम्यान बांगरने सांगितले होते की, 1983 वर्ल्ड कपची फायनल त्याने आपल्या शेजारच्या घरी पाहिली होती. त्यानंतरच त्याला क्रिकेट खेळायला प्रेरणा मिळाली. 
- संजय बांगर मराठवाड्यातील बीडचा रहिवासी आहे. महाराष्ट्राच्या अंडर-15 टीममध्ये सिलेक्ट होताच तो क्रिकेटमध्ये करियर बनविण्यासाठी औरंगाबादहून मुंबईला शिफ्ट झाला होता. 
- बांगरने सुरुवातीला महाराष्ट्र आणि मुंबई टीमकडून क्रिकेट खेळला. मात्र, नंतर रेल्वेत नोकरी मिळाल्याने तो रेल्वेकडून खेळू लागला.
- वयाच्या 21 व्या वर्षी रेल्वेकडून खेळताना विदर्भविरूद्ध डोमेस्टिक क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. तो टीमसाठी सलामीला खेळायचा तर बॉलिंगही सुरूवातीलाच करायचा. 
- वर्ष 2000-01 च्या रणजी सीजनमध्ये त्याची कामगिरी पाहता त्याची इंग्लंडविरूद्ध होणा-या कसोटी मालिकेसाठी निवड झाली होती.
 
असे राहिले कोचिंग करियर-
 
- संजय बांगर इंडिया 'ए' टीम चा कोच राहिला आहे. तो वर्ष 2010 मध्ये IPL टीम कोच्ची टस्कर्सचा कोच बनला. जानेवारी 2014 मध्ये तो किंग्स इलेवन पंजाबचा असिस्टेंट कोच बनला. नंतर त्याला टीमचा हेड कोच बनवले गेले.  
- ऑगस्ट 2014 मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत दारूण पराभव झाल्यानंतर बांगरला टीम इंडियाचा बॅटिंग कोच बनवला. जून 2016 मध्ये झिम्बाब्वे दौ-यावर गेलेल्या टीम इंडियाचा तो हेड कोच होता. 
- अनिल कुंबळे हेड कोच बनल्यानंतर पुन्हा एकदा तो टीम इंडियाचा बॅटिंग कोच बनला. आताही तो रवी शास्त्रींसोबत बॅटिंग कोच म्हणून काम करताना दिसेल. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, संजय बांगरचे पर्सनल लाईफचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...