आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Bangar Selected To Kings Eleven As Assistant Coach

किंग्ज इलेव्हनच्या सहायक प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - किंग्ज इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमियर लीगच्या सातव्या सत्रासाठी भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू संजय बांगरची सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. रेल्वेचा माजी कर्णधार संजय बांगरने या रणजी सत्रात प्रशिक्षक म्हणून शानदार कामगिरी करताना संघाचा दर्जा उंचावला.
या नियुक्तीवर संजय बांगरने आनंद व्यक्त केला असून हे जबाबदारीचे काम पेलण्यास आपण सज्ज असल्याचे त्याने म्हटले. ‘या वर्षी नवा संघ असून युवा खेळाडूंसोबत काम करण्याची संधी मला मिळणार आहे. मी संघासोबत काम करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करीत आहे. येत्या सत्रात संघाची कामगिरी चांगली होईल, यासाठी मी पूर्णपणे योगदान देईल. युवा खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असे बांगरने नमूद केले.
किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत काम करण्याची संधी मिळणे, हा मोठा सन्मान आहे. मला दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे, असेही त्याने नमूद केले.
योग्य प्रशिक्षक मिळाला
संजय बांगरचा स्वभाव, खेळातील ज्ञान, अनुभव आणि काम करण्याची शैली वेगळी आहे. आम्हाला त्याच्यासारखाच प्रशिक्षक हवा होता. बांगरच्या रूपाने आम्हाला योग्य पर्याय मिळाला आहे, असे पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने सांगितले.