आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarah Taylor: Men\'s Cricket Can Only Help My Game. I Would Love To Do It

पुरूषांच्‍या टीममधून खेळणार इंग्‍लंडची महिला क्रिकेटपटू ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्‍लंडची महिला क्रिकेटपटू यष्‍टीरक्षक फलंदाज सारा टेलर पुढील सत्रात देशांतर्गत क्रिकेटमध्‍ये ससेक्‍स संघाकडून खेळण्‍याची शक्‍यता आहे.

ब्रिटनच्‍या गार्डियन वृत्तपत्रात आलेल्‍या वृत्तानुसार टेलरचा ससेक्‍सच्‍या पुरूष टीमकडून खेळण्‍यासाठी चर्चा सुरू आहे. ससेक्‍सने याबाबतीत महिला टीमचे कोच मार्क लेन यांच्‍याशी चर्चा केल्‍याचे स्‍वत: टेलरने सांगितले आहे. इंग्‍लंड टीमची प्रमुख खेळाडू असलेली टेलर महिलांच्‍या वनडे विश्‍वचषकात सहभागी होण्‍यासाठी भारतात येत आहे.