आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarita Devi Emotional Refuses Bronze Medal In Incheon Games 2014

VIDEO : गुणदानामधील ‘भेदभाव’मुळे नाराज सरीताने पदकावर सोडले पाणी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो – पोडियमवर रडताना सरीता देवी)
इंचियोन - आशियाई स्पर्धेत भारताची युवा बॉक्सर सरिता देवीने कांस्‍य पदक स्विकारण्‍यास नकार दिला. सेमीफायनलमध्‍ये दक्षिण कोरियाच्‍या बॉक्‍सरसोबत झालेल्‍या लढतीतील पंचानी केलेल्‍या भेदभावामुळे सरीतादेवीने पदक स्विकारायला नकार दिला.
रात्रभर रडत होती सरीता
लाइटवेट प्रकारातील पदक विजेत्‍यांना जेव्‍हा पोडियमध्‍ये बोलविण्‍यात आले तेव्‍हा सरीताच्‍या डोळयांत अश्रूंचा पूर होता. ती हमसून हमसून रडत होती. तिचा चेहरा पाहताच ती रात्रभर रडत असल्‍याचे दिसत होते.
पदक स्विकारण्‍यास नकार
सरीता पोडिअमवर रडत होती. तिचे चाहते नारेबाजी करत होते. प्रथेप्रमाणे सुवर्ण पदक विजेत्‍या देशाचे राष्‍ट्रगीत सुरु होते अशा वेळी सरीता पोडिअमवरुन उतरली आणि आपल्‍याकडील कांस्‍य पदक दक्षिण कोरियाची बॉक्‍सर पार्क जीनाच्‍या गळ्यात घातले. तिची अशी प्रतिक्रिया पाहून सर्व खेळाडू आश्‍चर्यचकित झाले होते. पार्क जीनाला काय करावे तेच सुचत नव्‍हते. पार्क जीनाने पदक सरिताला देऊ केले. परंतु सरीतादेवीने पदक प्रेमाने नाकारले. नंतर पदक पोडिअमवर ठेवून तिने पोडिअम सोडले.
कारवाईस तयार
सरीताने पदक पोडिअमवर सोडताच अधिका-यांनी पदक सुरक्षित ठेवले. सरीताने संपूर्ण वादावर म्‍हटले की, ‘’मला वाटते मी पदक स्विकारने चांगले नव्‍हते. मी अंतीम सामन्‍यामध्‍ये पोहोचाण्‍याची दावेदार होती. आता माझ्यावर काही कारवाई झाली तरी मी त्‍याला सामोरी जायला तयार आहे.’’
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय आहे संपर्ण प्रकरण? अंतीम स्‍लाइडवर पाहा VIDEO