आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarita Devi Experienced Partiality In Asian At Asian Games, Divya Marathi

पक्षपातीपणा: सरिताने कांस्यपदक प्रतिस्पर्धी खेळाडूच्या गळ्यात टाकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - एशियाड बॉक्सिंग सेमीफायनलमध्ये वादग्रस्तपणे पराभूत घोषित केल्यानंतर भारताची बॉक्सर एल. सरिता देवीने आपले कांस्यपदक प्रतिस्पर्धी कोरियन खेळाडूच्या गळ्यात टाकून पक्षपातीपणाचा निषेध व्यक्त केला. महिलांच्या ५७-६० किलो वजन गटाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात हा प्रकार घडला. सोहळ्यात सरिताने रडत रडत पदक न स्वीकारता ते प्रतिस्पर्धीच्या गळ्यात घातले.

अपील फेटाळले : पंचांनी द. कोरियाची बॉक्सर पार्क जिनाला ३-०ने विजेता घोषित केले. या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे म्हणत अधिका-यांनी भारताचे अपील फेटाळले.

मेरी कोमचे गोल्ड सरिताला अर्पण
तीन मुलांची 'सुपर मॉम' मेरी कोमने बुधवारी कझाकिस्तानच्या झैनाला २-०ने हरवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मात्र, पंचांच्या पक्षपातीपणाचा बळी ठरलेल्या सरिताला मेरीने हे सुवर्ण अर्पण केले.