आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarita Devi Gets One Year Ban For Refusing Asian Games Bronze

भारतीय बॉक्सर सरितादेवीला दिलासा, आजन्म ऐवजी एका वर्षांची बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दक्षिण कोरियात पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणा-या एल. सरिता देवी हिच्यावर एआयबीए (आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संस्था) आज (बुधवार) एक वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, भारतीय संघाचे प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
इन्चॉन येथे खेळण्यात आलेल्या आशियाई स्पर्धेत सरिता देवी हिने उपांत्य फेरीतील सामन्यात दक्षिण कोरियाच्या पार्क जिनावर वर्चस्व गाजविले होते पण पंचांनी तिच्याविरोधात निकाल दिला होता. याचा निषेध करण्यासाठी सरिता देवीने कांस्य पदक स्वीकारण्यास नकार दिला होता.
या घटनेची आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेतर्फे गंभीर दखल घेण्यात आली व सरिता देवीला अजन्म निलंबित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आज तिच्यावर एक वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.