(फाइल फोटो - सौरभ घोषाल)
इंचियोन - 17 व्या आशियाई स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून भारताच्या स्क्वॅशपटूने इतिहास रचला आहे. स्क्वॅशपटू सौरभ घोषालने अंतीम फेरीत धडक दिली होती. सर्वंच भारतीयांना त्याच्याकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा होती. परंतु सौरभला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
सौरभला कुवेतच्या अल्मेजायेन अब्दुल्लाहने 10-12, 2-11, 14-12, 11-8, 11-9 ने पराभूत केले. यापूर्वी सौरभने 2006 आणि 2010 मध्ये आशियाई खेळामध्ये कास्यपदकाची कमाई केली होती.
रचला इतिहास
सौरभने आशियाई स्पर्धेत रौप्यपदाकाची कामगिरी करुन इतिहास घडवला आहे. स्क्वॅशमध्ये रौप्य पदक प्राप्त करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, यापूर्वी सौरभची कामिगिरी..