आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाला धक्‍का, दुखापतग्रस्‍त फल्कनर विश्‍वचषतील सुरुवातीच्‍या सामन्‍यातून बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- ऑस्‍ट्रेलयन संघाचा अष्‍टपैलू खेळाडू जेम्स फल्कनर मांसपेशिच्‍या दुखापतीमुळे विश्‍वचषकातील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नसल्‍याचे ऑस्‍ट्रेलियन संघाने सांगितले आहे. त्‍यामुळे ऑस्‍ट्रेलियन संघासमोर मोठे संकट कोसळले आहे.
अंतीम सांमन्‍यात झाला दुखापतग्रस्‍त
24 वर्षीय फल्कनरने मेलबर्नमध्‍ये सोमवारी इस्पितळात चेक अप केले. फल्कनर रविवारी झालेल्‍या तिरंगी लढतीमध्‍ये अंतीम सामन्‍यात गोलंदाजी करताना दुखापतग्रस्‍त झाल्‍याचे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे फीजियोथेरेपिस्ट अलेक्स काउंटूरियस यांनी सांगितले.
लवकर बरे होण्‍याची शक्‍यता
फल्कनरच्‍या वैद्यकिय अहवालानुसार, त्‍यांच्‍या पोटामधील मांसपेशी अजूनही ताणलेल्‍या आहेत. गोलंदाजी करताना जोरात वाकल्‍यामुळे पोटात असा त्रास जाणवायला लागतो. फीजियोथेरेपिस्टने या दुखापतीस नॉर्मल सांगितले आहे. परंतु, जोपर्यंत फल्कनर पुर्णपणे तंदुरुस्‍त होत नाही तोपर्यंत त्‍याच्‍यावर उपचार सुरुच राहणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.