आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Student Sports Subject Issue In Maharashtra

संघटनांच्या क्रीडा स्पर्धांतील खेळाडू गुणांपासून वंचित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केवळ नापास होणार्‍या खेळाडूंनाच गुण देण्याचा निर्णय घेऊन आधीच खर्‍या क्रीडापटूंवर झालेल्या अन्यायात क्रीडा संचलनालय आणि राज्य संघटनांच्या उदासीनतेमुळे अधिकच भर पडणार आहे. संघटना अधिकृत असल्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तताच राज्य संघटनांनी क्रीडा संचालनालयाला न दिल्याने आणि त्यामुळे अधिकृत संघटनांची यादीच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांपर्यंत न पोहोचल्याने यंदा संघटनांच्या स्पर्धांमध्ये खेळलेल्या खेळाडूंना (नापास) गुण मिळू शकणार नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

काही विद्यार्थी 25 गुणांच्या लाभाचा गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यशासनाने गतवर्षी विद्यार्थ्यांना 25 गुण देण्याच्या नियमात बदल केला. मात्र, रोगापेक्षा इलाज भयंकर या म्हणीनुसारच हा प्रकार घडला. या नवीन नियमानुसार जे खेळाडू केवळ नापास होणार असतील त्यांनाच 25 गुणांचा लाभ देण्याचा निर्णय झाल्याने जे खेळाडू खेळतात आणि अभ्यासातही कमी पडत नाहीत, त्यांना या नियमाचा फटका यंदा बसलाच आहे. त्याचबरोबर क्रीडा संचालनालय आणि राज्य संघटनांच्या उदासीनतेचा फटका मोठा ठरणार आहे.

अनेक संघटनांचा परिणाम
राज्यात खेळांच्या 3 ते 4 संघटना कार्यरत आहेत. काही संघटना कागदोपत्री तर काही प्रत्यक्ष स्वरूपात काम करीत आहेत. याचाच परिणाम गुणदानावर पडत आहे.

अकरा मुद्द्यांबाबत मागितली माहिती
राज्य क्रीडा संचालनालयाच्या संचालकांनी सर्व संघटनांकडे 11 मुद्द्यांबाबत माहिती मागवली आहे. त्यानंतर संघटनेची मान्यता ठरवली . मात्र, अद्याप केवळ दोन -तीन संघटनांनीच कागदपत्रे सादर केली असून अन्य राज्य संघटनांनी अद्याप अनास्था दाखवली आहे.

अद्याप मिळाली नाही माहिती
क्रीडा संचालकांनी मागितलेल्या 11 मुद्द्यांबाबतची माहिती कोणत्याही राज्य संघटनांकडून अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सध्या केवळ शालेय स्पर्धांतर्गत खेळलेल्या (नापास ) विद्यार्थ्यांनाच 25 गुणांचा लाभ मिळू शकणार आहे.
-संजय सबनीस, सहायक संचालक, क्रीडा संचालनालय