आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Schumacher In Coma, \'critical\' After France Ski Accident

फॉर्म्युला वन कार शर्यतीचा बादशहा मायकल शुमाकर भीषण अपघातानंतर कोमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फॉर्मूला वन' कार रेसचा बादशहा मायकल शुमाकर एका अपघातात गंभीर जखमी झाली आहे. त्‍याच्‍या डोक्‍याला जबर मार लागला असून तो कोमात गेला आहे. फ्रांसमध्‍ये एका खासगी रिसॉर्टवर स्‍कीईंगचा आनंद लुटत असताना रविवारी हा अपघात घडला.

प्राप्‍त माहितीनुसार, तो मेरिबेल या रिसॉर्टमध्‍ये थांबला होता. या ठिकाणी स्‍कीईंगचा त्‍याने आनंद लुटला. परंतु, एका ठिकाणावर त्‍याचे संतुलन बिघडले आणि त्‍याचा अपघात झाला. त्‍याचे डोके एका दगडावर आदळल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. त्‍यामुळेच तो कोमात गेला. शुमाकरने स्‍कीईंग करण्‍यापूर्वी हेल्‍मेट घातले होते. तरीही त्‍याच्‍या डोक्‍याला जबर मार लागला.

शुमाकरवर घटनास्‍थळीच प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला हेलिकॉप्‍टरने जवळच्‍या फ्रेंच सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्‍यात आले. त्‍याच्‍यावर शस्‍त्रक्रीया करण्‍यात आली. परंतु, तो कोमात गेला. त्‍यामुळे त्‍याला झालेली जखम अतिशय गंभीर स्‍वरुपाची असल्‍याचे निदान झाले. त्‍यानंतर पॅरिस येथून प्रसिद्ध न्‍युरोसर्जन आणि इतर डॉक्‍टरांना पाचारण करण्‍यात आले. शुमाकरचा येणा-या शुक्रवारी 45 वा वाढदिवस आहे. सात वेळा फॉर्म्‍युला वन शर्यतीचा चॅम्पियन राहिलेल्‍या शुमाकरने 2004 मध्‍ये अखेरचे चॅम्पियनपद पटकावले होते. गेल्‍या वर्षी ब्राझिलियन ग्रॅन्ड प्रीनंतर त्याने निवृत्ती घेतली होती.