आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी आणि मुलांना ओळखू लागला 'शुमी', मुलीचा आवाज ऐकून तराळले अश्रू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : पत्नी कॉरिनासोबत शुमीचा एक जुना फोटो.
ग्लॅन (स्वित्झरलँड) - माजी फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकल शुमाकर म्हणजेच शुमीची प्रकृती दिवसेंदिवस सावरत असल्याचे वृत्त आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता तो पत्नी आणि मुलांना ओळखू लागला आहे. डिसेंबर 2013 मध्ये स्कीइंग करताना झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. सध्या घरीच त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आवाज ऐकूण तराळले अश्रू
शुमाकरची पत्नी कॉरिनाने एका मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आता तो आम्हाला ओळखू लागला आहे. एकदा तर मुलीचा आणि माझा आवाज ऐकूण तो रडू लागला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. पण तो काही बोलू शकला नाही. माइकल शुमाकर केवळ बेडवर झोपून राहत नाही. थेरपीनंतर आता तो काहीवेळ खिडकीजवळ चेअरवर बसूनही राहतो.

स्कीइंग करताना झाला होता अपघात
30 डिसेंबर, 2013 रोजी शुमाकर स्वित्झरलँडच्या मेरीबेल येथील फ्रेंच स्की रिसॉर्टमध्ये स्कीइंग करताना एका खडकाला धडकून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्याच्या मेंदूलाही जबर मार लागला होता. त्यामुळे अनेक दिवस तो कोमातही होता. आठ महिने रुग्णालयात राहिल्यानंतर शुमी घरी परतला होता.

पुढे पाहा, या घटनेचे काही PHOTO