आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Test: Smith Completes Century, India On Back Foot

दुसरी कसोटी: स्मिथचे शतक; भारतीय संघ २६ धावांनी पिछाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - यजमान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज मिशेल जॉन्सन (८८ ), स्टार्क (५२), हॅझलवूड (३२) आरी लॉयन (२३) यांनी शानदार फलंदाजी करताना दुस-या कसोटीत आपल्या संघाचे दमदार पुनरागमन केले. २४७ धावांसाठी सहा गडी गमावणा-या यजमानांनी उसळी मारून आघाडी घेतली. गोलंदाज आणि कर्णधार स्मिथने (१३३) संघाचा डाव सावरला. त्यामुळे कांगारूंना पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी मिळाली. यासह ऑस्ट्रेलियाने पाहुण्या टीम इंडियासमोरच्या अडचणींत वाढ केली आहे.

प्रत्युत्तरात भारताने तिस-या दिवसअखेर एक बाद ७१ धावा काढल्या. सध्या भारतीय संघ २६ धावांनी पिछाडीवर आहे. पाहुण्या संघाकडे अद्याप नऊ विकेट शिल्लक आहेत. शिखर धवन (२६) आणि चेतेश्वर पुजारा (१५) मैदानावर खेळत आहेत. भारताचा सलामीवीर मुरली विजय अवघ्या २७ धावा काढून तंबूत परतला.

दुस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ३५५ धावा काढल्या गेल्या आणि सात विकेट पडल्या. दिवसभर फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही सामन्यात दबदबा निर्माण केला. यात कांगारूंच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. या चार गोलंदाजांनी दिवसभरात १९५ धावा काढल्या. यात ऑस्ट्रेलियाने काढलेल्या धावांतील ५५ टक्के धावा या गोलंदाजांनी काढल्या.

भारतीय संघाने शुक्रवारी सुरुवातीची ६३ मिनिटे शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. यादरम्यान, सामन्यात केवळ तीन चौकार आणि ३९ धावा काढण्यात आल्या. मिशेल मार्श आणि हॅडिनलाही तंबूत पाठवले. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजी ढेपाळली. याचाच फायदा घेत जॉन्सनने शानदार खेळी केली. सुमार गोलंदाजीच्या बळावर पुढील ५७ मिनिटांत १४ चौकार खेचले गेले. तसेच वेगाने ९१ धावा काढल्या गेल्या. एकही गडी पॅव्हेलियनमध्ये परतला नाही.

स्टीव्हन स्मिथ
133 धावा
191 चेंडू
13 चौकार
02 षटकार
ब्रिस्बेनवरील तिसरा दिवस 505
धावांची ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात खेळी 97
धावांची मिळवली पहिल्या डावात आघाडी 88
धावा जॉन्सनने काढल्या 52 धावांसह स्टार्कचे शानदार अर्धशतक
71 धावा भारताने काढल्या

स्थिम-जॉन्सनची शतकी भागीदारी
सहा बाद २४७ धावा अशा संकटात असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव स्थिम आणि जाॅन्सनने सावरला. या दोघांनी १४८ धावांची भागीदारी करून यजमानांच्या धावसंख्येला गती मिळवून दिली. स्मिथने १९१ चेंडूंचा सामना कराना १३ चौकार आणि दोन षटकारांच्या आधारे १३३ धावा काढल्या. तसेच जॉन्सनने ९३ चेंडूंत ८८ धावांची खेळी केली. यात १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

३६ वर्षांनंतर कांगारूंच्या कर्णधाराचे शतक
भारताविरुद्ध दुस-या कसोटीत कर्णधार स्टीव्हन स्मिथने शानदार शतकासह दमदार पुनरागमन केले. याशिवाय त्याने एका वेगळ्या कामगिरीचीही आपल्या नावे नोंद केली. कर्णधाराच्या भूमिकेत स्मिथने शानदार शतक झळकावून १९७८ च्या कामगिरीला उजाळा दिला आहे. ३६ वर्षांपूर्वी ही कामगिरी नोंदवली गेली होती. कर्णधाराच्या भूमिकेत पहिल्या सामन्यात शतक ठोकणारा स्टीव्हन स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा दहावा कर्णधार ठरला. तसेच स्थिमचे कसोटी करिअरमधील हे सहावे शतक ठरले. याशिवाय जॉन्सनने दहावे आणि स्टार्कने चौथ्या अर्धशतकाची आपल्या नावे नोंद केली.

ईशांत शर्माच्या तीन विकेट्स
गोलंदाजीत भारताकडून ईशांत शर्माने शानदार तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय उमेश यादवनेही तीन बळी मिळवले. त्याने २५ षटकांत १०१ धावा देताना हे यश संपादन केले. तसेच वरुण अ‍ॅरोन आणि आर. अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रोहित शर्मा मात्र सपशेल अपयशी ठरला. त्याने दाेन षटकांत दहा धावा दिल्या.