आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Personnel Prohibited Dilip Wengsarkar To Enter Into Wankhede Stadium

दिलीप वेंगसरकरांना नाकारण्‍यात आला वानखेडेवर प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) माजी उपाध्‍यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्‍या कारला मंगळवारी वानखेडे स्‍टेडिअममध्‍ये प्रवेश नाकारण्‍यात आला. त्‍यामुळे नाराज झालेल्‍या वेंगसरकरांनी घरी जाणे पसंत केले.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, एमसीएचे माजी उपाध्‍यक्ष वेंगसरकर मुंबई इंडियन्‍स आणि दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स दरम्‍यानचा सामना पाहण्‍यासाठी वानखेडे स्‍टेडिअमवर पोहोचले होते. वेंगसरकर यांच्‍याकडे मॅचचा अधिकृत पास होता. तसेच त्‍यांच्‍या गाडीवर सुरक्षा तपासणीचे स्‍टीकरही लावलेले होते. मात्र, त्‍यांच्‍या गाडीचा नंबर रजिस्‍टर नव्‍हता म्‍हणून त्‍यांना प्रवेश नाकारण्‍यात आला.

वेंगसरकरांनी सुमारे दहा मिनिटे पोलिस अधिका-यांना आपण भारतीय क्रिकेटपटू आणि एमसीएचा माजी उपाध्‍यक्ष असल्‍याचे सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. पण सुरक्षाकर्मचारी काही ऐकून घेण्‍याच्‍या मनस्थितीतच नव्‍हते. त्‍यामुळे या प्रकारावर नाराज होऊन वेंगसरकर तेथून घरी परतले.

यादरम्‍यान एमसीएचे संयुक्‍त सचिव नितीन दलाल यांनीही याप्रकारबद्दल खेद व्‍यक्‍त केला. झालेला प्रकार दुर्दैवी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. ते म्‍हणाले,' आम्‍हाला जेव्‍हा याची माहिती मिळाली तेव्‍हा आमचे अधिकारी तिथे पोहोचले, परंतु तोपर्यंत वेंगसरकर तेथून गेले होते. पोलिस अधिका-यांनीही नंतर याबाबत खेद व्‍यक्‍त केला.'

यापूर्वी, 2002 साली पॉली उम्रीगर यांनाही वानखेडेवर येण्‍यास रोखले होते. उल्‍लेखनीय म्‍हणजे ज्‍या प्रवेशद्वारातून उम्रीगर जात होते. त्‍याला त्‍यांचेच नाव होते.