आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - स्वप्न बघा..नुसते स्वप्नाळू बनू नका..आपले स्वप्न पूर्ण करण्याठी जीव तोडून प्रयत्न करा..स्वप्नेसुद्धा पूर्ण होतात..शॉर्टकटने यश मिळत नाही..खेळावर तुमचे खरे प्रेम असेल तर शंभर टक्के योगदान द्या..मग यश तुमच्यापासून दूर राहूच शकत नाही...असा ‘विजयी’ गुरुमंत्र युवा क्रिकेटपटूंना गुरुवारी विजय झोलने दिला. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आयोजित स्वागत समारंभात विजय बोलत होता.
विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाने ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले होते. जबरदस्त प्रदर्शनामुळे या मालिकेत विजय मालिकावीराचा मानकरी ठरला.
‘ऑस्ट्रेलिया दौ-यातील विजेतेपदामुळे आत्मविश्वास वाढला आहे. आता श्रीलंका दौ-यात ही विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार,’ असे तो म्हणाला. या कार्यक्रमाला विजयचे आई-वडील, प्रदीप देशमुख, प्रशिक्षक राजू काणे आणि वाग्दत्त वधू दर्शना खोतकर यांची उपस्थिती होती.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार. प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, संजय शिरसाठ, कल्याण काळे, संतोष सांबरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, सीमा खोतकर, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सुशील धूत, किरण वाडी, विनय सुराणा, उमेश ठक्कर, निखिल पटेल, संदीप मालू, मनीष धूत, भावेश सराफ, गोविंद शर्मा, राम भोगले, सचिन मुळे, शिरीष बोराळकर, जे. यू. मिटकर आदींची उपस्थिती होती.
पाकविरुद्धच्या पराभवाची खंत
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळताना वेगळी खुन्नस असते. आशिया चषकमध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार शतकी खेळी केली होती. मात्र, भारताच्या केवळ 1 धावेने झालेल्या पराभवाची खंत वाटते, असे एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विजय म्हणाला. माझे आवडते फलंदाज मायकेल हसी, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग आहेत. गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुरेश रैना आवडते खेळाडू आहेत, असेही तो म्हणाला.
एडीसीएचा ‘तुम्हारे खत में हमारा सलाम’
ऑस्ट्रेलिया दौ-याहून परतल्यानंतर भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार विजय झोलचे औरंगाबादच्या क्रिकेटपे्रमींनी जंगी स्वागत केले. मात्र, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेला त्याचा विसर पडला. क्रीडाप्रेमींनी ठेवलेल्या सत्कार समारंभात जिल्हा संघटनेने विजयचा सत्कार करून ‘तुम्हारे खत में हमारा सलाम’ ठोकला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.