आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेहवाग, गंभीरचे लवकरच पुनरागमन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर लवकरच भारतीय संघात पुनरागमन करतील, असा विश्वास दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) नवनियुक्त अध्यक्ष एस.पी.बन्सल यांनी व्यक्त केला. त्यांनी सेहवाग आणि गंभीरच्या टीम इंडियामधील पुनरागमनाविषयी आपले मत मांडले.
‘प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. काही काळ त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र, त्याचा अर्थ ते खेळाडू प्रवाहाच्या बाहेर पडले, असा होत नाही. देशांतर्गत स्पर्धेत कामगिरीचा दर्जा उंचावून सेहवाग व गंभीर टीम इंडियातील प्रवेश निश्चित करतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे,’ असेही ते म्हणाले.