आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sehwag, Jhahir, Bhajji Out From BCCI's Agreement

बीसीसीआयच्या करारातून सेहवाग, जहीर, भज्जी बाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय संघाचे आधारस्तंभ समजले जाणारे वीरेंद्र सेहवाग, जहीरखान, हरभजनसिंग यांना बीसीसीआयच्या 2013 -14 च्या करारात स्थान देण्यात आलेले नाही. निवृत्ती घेतल्यानंतरही बीसीसीआयने सचिनसोबत करार मोडलेला नाही, हे विशेष.
बीसीसीआयने गत वर्षाच्या करारातील 37 खेळाडूंपैकी केवळ 25 खेळाडूंसमवेतच वार्षिक करार केला आहे. त्यातही केवळ पाच खेळाडूंना ‘अ’ श्रेणीत स्थान देण्यात आले असून त्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी, उपकर्णधार विराट कोहली, सुरेश रैना, आर. अश्विन आणि सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंसमवेत एक कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.
करारात सहभागी करण्यात आले नसल्याने हा कदाचित सेहवाग युगाच्या अस्ताचाही प्रारंभ गणला जाऊ शकतो. सेहवागने मार्चपासून एकही सामना खेळलेला नाही.
गंभीर, युवराजची करारात घसरण
गौतम गंभीर आणि युवराजला ‘ब’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय शिखर धवन, मुरली विजय, रवींद्र जडेजा, प्रज्ञान ओझा, उमेश यादव, चेतेश्वर पुजारा, भुवनेश्वर कुमार आणि रोहित शर्मा यांच्यासह आश्चर्यकारकरीत्या ईशांत शर्मालादेखील ‘ब’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. हरभजनचा मार्ग अश्विनमुळे जवळपास बंदच झाल्यात जमा असल्याने त्याच्यासह इरफान पठाणलाही करारात स्थान मिळालेले नाही. या करारातील खेळाडूंना वार्षिक 50 लाख रुपये मिळणार आहेत.