Home »Sports »Other Sports» Sehwag Like A Terrorist When He Gets Going: Sadiq

वीरेंद्र सेहवाग क्रिकेटमधील 'दहशतवादी'च- सादिक मोहम्मद

दिव्य मराठी वेब टीम | Jan 02, 2013, 15:13 PM IST

  • वीरेंद्र सेहवाग क्रिकेटमधील 'दहशतवादी'च- सादिक मोहम्मद
कोलकाता- पाकिस्तानचा क्रिकेटपटू व माजी सलामीवीर सादिक मोहम्मद यांनी वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक खेळीचे दिलखुलास कौतूक केले आहे. सेहवाग ज्या दिवशी चालतो व आक्रमक धावा काढतो तेव्हा त्याला कोणीही रोखू शकत नाही. सेहवाग त्यावेळी खरे तर विरुद्ध संघातील गोलंदाजांना दहशतवाद्यासारखाच वाटतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरु असलेल्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकेचे सदिच्छा दूत म्हणून आहेत. त्यामुळे सादिक सध्या भारत दौ-यावर असून ते कोलकात्यात आहेत. त्यावेळी सादिक बोलत होते.
ते म्हणाले, पाकिस्तान संघातील सध्याचा सलामीवीर नासीर जमशेद यांच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. तो तांत्रिकदृष्ट्या उत्तम खेळाडू असून, त्या जोरावर खेळपट्टीवर दिर्घकाळ आपले पाय रोवून थांबू शकतो. नाशीर जर खेळपट्टीवर स्थिरावला तर तो इतर फलंदाजांपेक्षा धोकादायक ठरु शकतो.
नाशीरच्या तुलनेत सेहवाग फारच धोकादायक खेळाडू असल्याचे सांगून सादिक म्हणाले, नाशीरच्या तुलनेत सेहवागला लवकर बाद शक्य होते. सेहवागला लवकर बाद करणे २५ टक्के वेळा शक्य असते. मात्र, नाशीर खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर त्याला बाद करणे कठिण आहे.

Next Article

Recommended