आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला वर्गात मित्रांनी चिडवू नये म्हणून सेहवागने केली स्फोटक फलंदाजी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंजाब सुपर किंग्सच्या कोलकात्याच्या संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये आणखी एक मोठा विजय अनुभवला. तोंडाशी आलेला घास वाया जावू नये म्हणून त्यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा होता. पण या विजयाचा हिरो मात्र यावेळी मॅक्सवेल नव्हता. तर शुक्रवारी चेन्नईला सळो की पळो करणारा ठरला, आपला वीरू म्हणजेच, वीरेंद्र सेहवाग. वडील फॉर्मात नसल्याने मुलाला मित्र वर्गात चिडवायचे त्याच्यासाठीच ही खेळी केल्याचे सेहवागने सामन्यानंतर सांगितले.
फॉर्म हरवल्यामुळे भारतीय संघापासून सेहवागला अनेक दिवसांपासून दूर रहावे लागले आहे. यंदाच्या आयपीएलच्या पर्वातही वीरूला हवा तसा फॉर्म सापडलेला नव्हता. तरीही वीरूने 300 च्या वरच धावा केल्या होत्या. पण वीरूच्या स्फोटक फलंदाजीचा अनुभव घेण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली ती शुक्रवारी. मॅक्सवेल नावाच्या वादळाला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना वीरूच्या सुनामीचा अनुभव मिळाला आणि चेन्नईच्या संघाची तिस-या आयपीएल विजेतेपदाची स्वप्नेही यामध्ये वाहून गेली. 58 चेंडूमध्‍ये ठोकलेल्या 12 चौकार आणि 4 षटकारांच्‍या जोरावर त्याने 122 धावा केल्‍या.
वर्गात मुलाला चिडवत होते मित्र

तुफानी खेळीनंतर प्रतिक्रिया देताना सेहवागने या खेळीमागचे गुपित उघडले. आयपीएलचे यंदाचे पर्व सुरू झाल्यापासूनच माझा मुलगा माझ्या कामगिरीवर समाधानी नव्हता. मी खेळत नसल्यामुळे त्याला वर्गात मित्र तझे वडील काहीही धावा करत नसल्याचे चिडवतही होते. पण अजूनही काही सामने शिल्लक आहेत, त्यामुळे संघासाठी एकदा तरी विजयी खेळी करणारच असे वचन मी त्याला दिले होते. ते वचन पूर्ण करण्यात मला यश आल्याचा आनंद असल्याचे वीरू म्हणाला. संघाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना माझे स्वतःच्या खेळाकडे दुर्लक्ष होत होते, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मग मी माझ्या खेळावर अधिक लक्ष केंद्रीत केले आणि त्याचा परिणाम सर्वासमोर आहे, असे सेहवागने सांगितले.
वीरूची खेळी, प्रितीचा आनंद याची छायाचित्रे पाहा पुढील स्लाईड्सवर....