» Sehwag Want To Play In Middle

मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सेहवाग इच्छुक

वृत्तसंस्था | Feb 19, 2013, 02:57 AM IST

  • मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सेहवाग इच्छुक

चेन्नई - भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आता मधल्या फळीत फलंदाजी करण्यास इच्छुक आहे. मागच्या दोन वर्षांत सेहवागला कसोटीत एकच कसोटी शतक झळकावण्यात यश आले आहे. मधल्या फळीत खेळण्यास इच्छुक असल्यामुळेच सेहवागची टीम इंडियात निवड झाल्याची चर्चा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत सेहवाग सलामीला खेळण्याची शक्यता कमीच आहे.

गौतम गंभीरला संघातून वगळल्यानंतर सेहवागच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. वीरू गेल्या काही दिवसांपासून फॉर्मशी संघर्ष करतोय. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारताची मधली फळी दुबळी झाली आहे. अशा परिस्थितीत भारताला मधल्या फळीत मजबूत फलंदाची गरज आहे. सेहवाग ही जबाबदारी पेलण्यास तयार आहे. चेन्नई कसोटीत सेहवागने ओपनिंग केली नाही तर ही जबाबदारी धवन आणि मुरली विजय पार पाडू शकतात.

पहिल्या कसोटीत डेव्हिड वॉर्नर नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 फेब्रुवारीपासून आयोजित पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर खेळू शकणार नाही. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. वॉर्नरने आतापर्यंत एकूण 15 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 3 शतके आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 1068 धावा काढल्या आहेत.

Next Article

Recommended