आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् वीरूने सचिनला जिओ सीम गिफ्ट मागितले, शुभेच्छा दिल्यानंतर वीरू फॉर्मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने गुरुवारी वयाची ३८ वर्षे पूर्ण केली. क्रिकेटजगत, आजी-माजी खेळाडू, चाहते, समालोचक यांच्याकडून त्याच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस झाला. िट्वटरवर आपल्या अनोख्या शैलीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागलाही त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी खास शैलीत शुभेच्छा दिल्या.

सेहवागने कसोटीत दोन त्रिशतके आणि वनडेत द्विशतक ठोकले आहे. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेहवागच्या फलंदाजी शैलीचे त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा देताना खास वर्णन केले. सेहवागला बिग बी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, आकाश चोप्रा या दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या.
आकाश चोप्राने िट्वट केले की, ‘कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलामीची फलंदाजी मी दोन कालखंडात विभागतो. हे दोन कालखंड (BS and AS) असे असतील. म्हणजे, बिफोर सेहवाग आणि आफ्टर सेहवाग. वाढदिवसाचे अभीष्टचिंतन.’ अनिरुन चौधरीने िट्वट केले, ‘बॉलर्स का खौफ, िट्वटर का स्वाद, कॉमेंट्री की आग... नाम तो सुनाही होगा.. वीरेंद्र सेहवाग.’ मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही वीरूला शुभेच्छा दिल्या. सचिनने िट्वट केले की, ‘मऊ मनाचा माणूस, मात्र मैदानावर अनेकांच्या चिंधड्या उडवणारा म्हणजे सेहवाग. हॅपी बर्थडे लाला.’ सेहवागने लगेच उत्तर देऊन सचिनला िट्वट केले, ‘वाह पाजी थँक्स. आज शाम की पार्टी मे आप जरूर आना. साथ में गिफ्टमें जिओ का सिम चाहिये.’

कोच अनिल कुंबळेनेही सेहवागला शुभेच्छा दिल्या. माजी क्रिकेटपटू मोहंमद कैफने िट्वटरवर एक फोटो पोस्ट केला. यात तो सेहवाग आणि जहीर खानसोबत दिसत आहे. ‘किंग ऑफ एंटरटेनमंेट.. सेहवाग.. एचबीडी’ अशा शुभेच्छा कैफने दिल्या. हरभजनने िट्वट केले की, ‘सिधा साधा भोला जाट, जिसकी छबी पर ना कोई दाग, इसका बॅट बरसाये हमेशा आग.. हॅपी बर्थडे सेहवाग.’ महेंद्रसिंग धोनीने सेहवागचे पोस्टर पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या.

सेहवाग-भोगलेची जुगलबंदी
क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेने सेहवागला शुभेच्छा देताना िट्वट केले की, ‘अलग सोच, अलग लय, ना जाना तुमने कभी भय. तरिका आपका पैसा वसूल, सालगिराह की दुआएं किजीऐ कुबूल.’ यावर सेहवागनेही आपल्या खास फलंदाजीच्या मनोरंजक शैलीत उत्तर दिले. सेहवाग म्हणाला, ‘कुबूल है, कुबूल है भोगलेजी. धन्यवाद. आपकी शुभकामनाओ के लिये. एक हर्षा है, जिसकी आवाज के लिये जनता तरसा है.’ यावर हर्षा भोगलेने पुन्हा िट्वट करून उत्तर दिले. भोगलेने म्हटले की, ‘सूर तो हुजूर बल्ले का लगता है, आवाज सिर्फ साथ देती है. महफिल तो आपने सजाई थी, दर्शक का भी थोडा नाम हो गया.’
पुढे स्लाईडद्वारे वाचा, सेहवागला शुभेच्छा देणारी टि्वटस आणि त्याला त्याने दिलेली मजेशीर उत्तरे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...