आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Selection Committee Will Go On Tour, BCCI Policy Change

निवड समिती सदस्य दौ-यावर जाणार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या धोरणात बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे परदेश दौ-याचे पर्यटन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्याअन्वये सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेसाठी रॉजर बिन्नी आणि रजिंदरसिंग हंस हे दोन निवड समिती सदस्य जाणार आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान विक्रम राठोड व साबा करीम हे दोन निवड समिती सदस्य भारतीय संघासोबत असतील. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दौ-यावर जाण्यास आपल्याला रस नसल्याचे कळवले आहे. बीसीसीआयचे क्रिकेट मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी 'दिव्य मराठी'ला ही माहिती दिली.

लवकरच निवड समिती सदस्यांची पहिली तुकडी मेलबर्नमध्ये दाखल होईल, असा अंदाज आहे. दौ-यावरील निवड समितीमध्ये प्रशिक्षक, कप्तान व उपकप्तान यांचा समावेश असतो. अंतिम ११ खेळाडू निवडण्याचा या तिघांचाच अधिकार असून बीसीसीआयच्या त्या धोरणात बदल झाला नाही, असे शेट्टी म्हणाले.

पर्यटनाला विराेध : वेंगसरकर बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष असताना स्वत: अंतिम संघनिवडीसाठी संघ व्यवस्थापन व निवड समितीसोबत बसायचे. ते मार्गदर्शन करायचे. त्या वेळीही बीसीसीआयचा हा नियम होता. फक्त पर्यटन करण्यासाठी निवड समिती सदस्याने संघासोबत दौ-यावर जाऊ नये, असेही बंधन होते.

संघातील खेळाडूंचे मनोधैर्य वाढवणार
संघातील खेळाडूंना मार्गदर्शन व्हावे, त्यांचे मनोधैर्य वाढवावे, या हेतूने निवड समिती सदस्यांना पाठवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यामुळे भारतीय संघाची मानसिक स्थिती चांगली नाही. विशेषत: गोलंदाजीच्या विभागाला आत्मविश्वास प्राप्त करून देणे गरजेचे आहे.