आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - सचिन तेंडुलकरपुत्र अर्जुन याच्या मुंबई 14 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या संघातील समावेशाबाबत मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात शंका उत्पन्न केली जात आहे. त्यामुळे या निवडीबाबत उठलेल्या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने 14 वर्षांखालील संघ निवड करणारी समिती आणि समन्वयक यांची बैठक उद्या (मंगळवार) पुन्हा बोलावली आहे. अर्जुन तेंडुलकर याच्या निवडीप्रमाणेच आकाश सावला, दर्शन पाडवे, तुनुष कोटियन, अझीम शेख, अभिषेक शेट्टी यांच्या निवडीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
* हरीश दफ्तरदार, मानस रायकर, जय दवे, जहांगीर अन्सारी, यश जोशी यांची हंगामातील कामगिरीच रेकॉर्डबुकमधून गायब झाली आहे.
*भूपेन लालवाणी, पुष्कर वशिष्ट, सत्यप्रकाश जैन, यशस्वी जयस्वाल, शोएब खान, हे फलंदाज आणि रोहित देसाई, सत्यक पटेल, राजेश सरदार या गोलंदाजांची चांगली कामगिरी असूनही त्यांना मुंबई संघातून डावलल्याचे आरोप होत आहेत.
* संघात निवड झालेल्या खेळाडूंची कामगिरी डावललेल्या खेळाडूंपेक्षा निकृष्ट असल्याचे आरोप या खेळाडूंच्या पालकांनी केले आहेत.
अर्जुनचे एकमेव अर्धशतक
अर्जुनची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 70 धावांची एकमेव खेळी. याआधी गत क्रिकेट हंगामात मे महिन्यात अर्जुनने खार जिमखान्यातर्फे खेळताना गोरेगाव केंद्राविरुद्धच्या 14 वर्षांखालील चाचणीत 128 धावा फटकावल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.