आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Selection Maker Skeptic Issue On Yuvraj Selection

युवीच्या निवडीबाबत निवडकर्ते संभ्रमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशांतर्गत खेळल्या गेलेल्या स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे युवराजसिंगच्या भारतीय संघातील निवडीबाबत निवडकर्तेदेखील संभ्रमात पडले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसमवेत होणारे तिरंगी सामने व विश्वचषकासाठी निवड समितीची बैठक होणार असून त्यात युवराजच्या विद्यमान फाॅर्ममुळे त्याचा विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करारबद्ध केल्या जाणाऱ्या ३० खेळाडूंच्या यादीतूनही युवराजला वगळण्यात आले होते. युवराजने हरियाणा, महाराष्ट्र व साैराष्ट्रविरुद्ध लागोपाठ शतके झळकावून निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले आहे. संघात अष्टपैलू खेळाडूंची उणीव लक्षात घेऊन युवीचा विचार केला जाऊ शकतो.

यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड : युवी हा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळ उंचावणारा खेळाडू आहे. २०११ च्या विश्वचषकातही तोच भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला होता. हा यशाचा आलेख त्याच्याबाबत विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे युवराजसिंगबाबत सकारात्मक विचार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

जडेजाची तंदुरुस्ती शक्य : रवींद्र जडेजा आठवडाभरात सरावाला प्रारंभ करू शकतो. तो चेन्नईमध्ये परिश्रम घेत आहे. त्यानंतरच विचार करणे शक्य असल्याचे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
वर्ल्डकपसाठी आज भारतीय संघ निवड
येत्या १४ फेब्रुवारीपासून वनडेच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाकडून कोण कोण खेळणार आहे, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागलेली आहे. आता बीसीसीआय मंगळवारी वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर करणार आहे. याच वेळी आगामी तिरंगी मालिकेसाठीदेखील भारतीय संघ निवडला जाणार आहे. येत्या १८ जानेवारीपासून तिरंगी मालिकेला सुरुवात होईल. यात भारतासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाचा समावेश आहे.