आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Selectors Must Think About Yuvraj Singh Says Chetan Chauhan

निवड समितीने युवराजचा विचार करावा : चौहान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - रणजी करंडक स्पर्धेत सलग तीन शतके ठोकणार्‍या युवराजसिंगने टीम इंडियात पुनरागमनाचा दावा मजबूत केला आहे. त्याला वर्ल्डकपच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीतून बाहेर ठेवले असले, तरी रवींद्र जडेजा तंदुरुस्त नसेल तर निवड समितीने युवीचा विचार करावा, असे मत माजी खेळाडू चेतन चौहान यांनी व्यक्त केले. युवीने तीन शतके झळकावून आपली लय पुन्हा मिळवली आणि तो तंदुरुस्तदेखील आहे. युवराजचा ऑस्ट्रेलियात होणार्‍या तिरंगी मालिकेसाठी संघात समावेश करायला हवा. वर्ल्डकपपूर्वी युवीला एका संधी द्यायला हवी, तो आजदेखील मॅच विनर खेळाडू असल्याचे चौहान म्हणाले.