आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयोवृद्ध क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे मुंबईत निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतातील सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. माधव मंत्री अविवाहित होते. 1951 ते 1955 या कालावधीत मंत्री 4 कसोटी सामने खेळले होते. इंग्लंडविरुद्ध कसोटीत एका डावात 3 यष्टिचीत व 3 झेलचा पराक्रम त्यांनी केला होता. क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर आणि माजी क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत दादर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कसोटीपटू निवड समिती सदस्य पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या उपक्रमात सहभागी होणारे माधव मंत्री समाजात अखेरपर्यंत कार्यरत होते. मुंबईविरुद्ध महाराष्ट्र या रणजी सामन्यादरम्यान ते चारही दिवस उपस्थित होते. मुंबईला त्यांनी तीन वेळा आपल्या नेतृत्वाखाली रणजी करंडक मिळवून दिला होता.

>माधव मंत्रींनी क्रि केट खेळायला उद्युक्त केले. ते निवड समितीवर असल्यामुळेच मला भारतीय संघात अखेरच्या क्षणी शिरकाव करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मजल मारू शकलो.
-अजित वाडेकर, मुंबई