आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Sport Journalist Chandrashekhar Saint Death News In Marathi

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार चंद्रशेखर संत यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठपत्रकार आणि मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर संत यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मुले आहेत.
‘महाराष्ट्र टाइम्स’ या वर्तमानपत्रामध्ये बरीच वर्षे क्रीडा पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. कपिलदेवच्या कर्णधारपदाखाली जिंकलेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना पाहणाऱ्या काही भाग्यवान पत्रकारांमध्ये चंद्रसेखर संतदेखील होते. कबड्डी आणि इतर देशी खेळांचे समीक्षण, संकलन बऱ्याच दूरचित्रवाहिन्यांवर करत असत. अभ्युदय बँकेमध्ये नोकरी करत असतानाच संत यांना क्रीडा पत्रकारितेची रुची लागली त्यांनी १९७८ मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये क्रीडा पत्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. गेली ३५ वर्षे क्रीडा पत्रकार म्हणून काम करताना क्रिकेटव्यतिरिक्त देशी खेळांवर मनापासून प्रेम केले.