आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serbian Sports Reporter Who Banned For Being Too Beautiful

PICS : अधिक सौंदर्यामुळे या टीव्ही रिपोर्टरला फुटबॉल मैदानावर जाण्यास बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्बियाच्या एका महिला टीव्ही रिपोर्टरला तिच्या सौंदर्यामुळे मैदानावर प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण जगातील मिडीयामध्ये या बातमीची चर्चा होत असून, सोशल मिडिया या रिपोर्टरच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी 25 वर्षीय टीव्ही रिपोर्टर कॅटरीना स्रेकोविचच्या विरोधात एका फुटबॉल टीमच्या खेळाडूंनी तिच्या सौंदर्यामुळे खेळात व्यत्यय येतो अशी तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर कॅटरीनाने सांगितले की, "माझ्या सौंदर्यामुळे माझी नोकरी तर जाणार नाही याची मला भीती होती." या रिपोर्टरच्या विरुद्ध रेड स्टार बेलग्रेडच्या फुटबॉल टीमने तक्रार दाखल केली होती. ही टीम सर्बियन सॉकर लीगमध्ये सर्वात दमदार मानली जाते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कॅटरीना स्रेकोविचचे फोटो...