आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुप्रसंग- वर्णद्वेषी हुटिंगमुळे सेरेनाला रडूच कोसळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो-सेरेना विल्यम्स)

कृष्णवर्णीय टेनिस खेळाडू असल्यामुळे मी दिसते. वेगळ्या पद्धतीचे कपडे घालते, खेळते. परंतु, मी कोर्टवर उतरते तेव्हा मी कोणाशीही दोन हात करू शकते. इंडियाना वेल्स, कॅलिफोर्नियाच्या टेनिस टूर्नामेंटचे माझ्या मनात खास स्थान आहे. मी तेथे माझी बहीण व्हीनससोबत १९९७ मध्ये दुहेरीत पहिला व्यावसायिक सामना जिंकला होता. मी तेथे २००१ मध्ये टायटल जिंकण्याच्या इच्छेने आले होते. पूर्णपणे तयार होते. परंतु, फायनलमध्ये जे झाले त्यासाठी मी तयार नव्हते. कोर्टमध्ये पोहोचताच प्रेक्षकांनी हुटिंग सुरू केले.
उपांत्य सामन्यात मला व्हीनससोबत खेळायचे होते. आजारी असल्यामुळे व्हीनस खेळू शकली नाही. पूर्ण करिअरच्या काळात माझ्यासाठी प्रामाणिकपणा आणि निष्ठा सर्वात महत्त्वपूर्ण राहिले. व्हीनसही तशीच आहे. दोघांवरील सामना निश्चितीच्या आरोपांनी आम्ही खट्टू होतो. वर्णद्वेषाच्या भावनेने अाम्हाला नाराज केले आणि आतून क्षतविक्षत केले.
पूर्ण तयारी आणि आत्मविश्वास असूनही खेळाडूच्या मनात ‘हे पुरेसे नाही’ अशा शंकेची पाल चुकचुकते. मनात शंका असूनही माझ्या जिंकण्याची इच्छा नेहमीच दृढ राहिली. इंडियाना वेल्समध्ये लोकांनी हुटिंग केले तेव्हा माझ्या जिंकण्याची इच्छा संपली. ही भावना दीर्घ काळ माझा, व्हीनस आणि नातेवाइकांचा पाठलाग करत राहिली. माझे वडील दु:खी अस्वस्थ होते. आम्ही चांगले खेळाडू बनावे म्हणून त्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले होते. अाता ते अापल्या कन्येसंबंधी टोणपे ऐकत होते. अापल्याशी गेल्या वर्षी झालेल्या गैरव्यवहाराच्या कटू आठवणी त्यांच्या मनात घुसळल्या गेल्या.
काही महिन्यांपूर्वी एका रशियन अधिकाऱ्याने माझ्या व्हीनसबद्दल वर्णद्वेषी प्रतिक्रिया दिली होती. वर्ल्ड टेनिस असोसिएशन आणि अमेरिकी टेनिस असोसिएशनने तत्काळ त्याचा निषेध केला. मी कित्येकदा म्हटले आहे, मी इंडियाना वेल्समध्ये कधीच खेळणार नाही. तेथे खेळण्याच्या कल्पनेने भीती वाटते. मला वाटते, मी कोर्टवर गेले हूट झाले तर काय होईल?
२००१ मध्ये इंडियाना वेल्समध्ये जिंकल्यानंतर रडण्याचे क्षण माझ्या स्मृतीत घट्ट बसले आहेत. लॉस एंजलिसला परतताना वाटते की, बराेबरीची मोठी लढाई मी हारले आहे. आईने मला प्रेम आणि क्षमा सोबतच जगण्याचाही धडा दिला आहे. म्हणून मी २०१५ इंडियाना वेल्स परतण्याचा निर्णय घेतला आहे.