माद्रिद - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने विजयी माेहीम अबाधित ठेवताना माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या दुस-या फेरीत स्लाेएन स्टीफन्सवर एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने ६-४, ६-० अशा फरकाने सामना जिंकला. अाता तिस-या फेरीतील तिचा सामना व्हिक्टाेरिया अझारेंकाशी हाेईल. अझारेंकाने दुस-या फेरीत टाॅमलिजनाेविकवर मात केली. तिने ६-३, ६-३ ने विजय मिळवला. दुसरीकडे मारिया शारापाेवानेही तिसरी फेरी गाठली. तिने डुक्युई-मारिनाेवर ६-१, ६-२ ने मात केली.
१९ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाने अापल्या नावे सलग २२ व्या विजयाची नाेंद केली. तिने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. त्यानंतर तिने दुस-या सेटमध्ये स्लाेएनला प्रत्युत्तराची फारशी संधीही मिळू दिली नाही. यासह तिने सामना अापल्या नावे केला. यासाठी स्लाेएनने दिलेली झंुज अपयशी ठरली.
वाेज्नियाकी, रादावांस्काची अागेकूच : महिला एकेरीच्या तिस-या फेरीत कॅराेलिना वाेज्नियाकी अाणि अग्निजस्का रादावांस्काने अापला प्रवेश निश्चित केला. वाेज्नियाकीने दुस-या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या क्रिस्टिना मॅकहॅलेचा पराभव केला. तिने ७-५, ६-० अशा फरकाने विजयाची नाेंद केली. यासाठी तिला पहिल्या सेटवर शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, सरस खेळी करत तिने सामना जिंकला. दुसरीकडे रादावांस्काने दुस-या फेरीत अाॅस्ट्रेलियाच्या कॅसी डेलेक्यूला धूळ चारली. तिने ६-२, ६-१ अशा फरकाने शानदार विजय मिळवला.
बाेपन्नाची विजयी सलामी
भारताच्या राेहन बाेपन्नाने पुुरुष दुहेरीमध्ये शानदार विजयी सलामी दिली. त्याने अापला राेमानियाचा सहकारी फ्लाेिरन मेर्गाेसाेबत पहिल्या फेरीत मारिन-हेन्रीवर ५-७,. ७-६, १०-६ ने मात करून दुसरी फेरी गाठली.