आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Serena, Nadal, Races To Eighth Title Of Year In Toronto

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेरेना, राफेल नदालने रॉजर्स चषकावर नाव कोरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माँट्रियल/टोरंटो - स्पेनच्या राफेल नदाल व जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने रॉजर्स चषकावर नाव कोरले. सेरेनाचे यंदाच्या सत्रातील हे आठवे आणि करिअरमधील 54 वे डब्ल्यूटीएचे विजेतेपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात रोमानियाच्या सोराना क्रिस्टियाला पराभूत केले. अव्वल मानांकित सेरेनाने 6-2, 6-0 अशा फरकाने सामना जिंकला. तिने 61 मिनिटात विजय मिळवला.

चौथ्या मानांकित राफेल नदालने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या मिलोस राओनिकला धूळ चारली. स्पेनच्या खेळाडूने 6-2, 6-2 अशा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. त्याने अवघ्या 68 मिनिटात विजेतेपद निश्चित केले. यापूर्वी उपांत्य फेरीत नदालने धक्कादायक विजय मिळवला. त्याने जगातील नंबर वन नोवाक योकोविकला पराभूत केले. त्याचा हा करिअरमधील योकोविकविरुद्ध दुसरा विजय ठरला.

मिलोस राओनिकने प्रथमच मास्टर्स चषक टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.