सेरेना, जोकोविचला रॉर्जसचे / सेरेना, जोकोविचला रॉर्जसचे अजिंक्यपदक

वृत्तसंस्था

Aug 17,2011 03:07:37 PM IST

मॉट्रियल - दुखापतीवर मात करून कोर्टवर परतलेल्या अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम व विम्बल्डन विजेता नोवाक जोकोविचने यंदाच्या रॉर्जस टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदाचा बहुमान पटकावला.

विम्बल्डनमधील अपयशातून सावरलेल्या सेरेनाने अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियन टेनिसपटू समंथा स्टोसूरला 6-4, 6-2 गुणांनी पराभवाची धूळ चारून किताबाचा दुहेरी धमाका उडवला, तर अमेरिकन मॉर्डी फिशवर विजय संपादन करून नोवाकने 4 वर्षांनंतर हा किताब पटकावला. पुरुष एकेरीत आतापर्यंतच्या फिश मार्डीविरुद्धच्या सातही लढतीत जोकोविचने विजयाचे सप्तरंग उधळले.

X
COMMENT